**#आयुष्याला_सतत_ऊर्जस्वल_बनवणारं_गिफ्ट*.
आयुष्याचा आधारवड या कार्यक्रमाच्या निमित्ताने(आदरणीय नितीन लोहट सर यांच्या विषयी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेला कार्यक्रम होता) डाॅ.सुनिलकुमार लवटे सर यांचा परिचय व सहवास आला.सरांच्या मार्गदर्शनाने मीच नव्हे तर उपस्थित असणारे सर्वच श्रोते आनंदाने नाहुन निघाली होती.
अत्यंत सुमधुर वाणीतलं मार्गदर्शन तो आवाज.आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला.माणुसकिच्या संवेदना वांझ अन भ्रष्ट झालेल्या जगात जणु तीच ऊर्जा आजही आम्हाला रचनात्मक शैक्षणीक साहित्यीक सामाजिक क्षेत्रात निरपेक्ष भावनेतुन काम करायला हिमत भरत असते.
डाॅ सुनीलकुमार लवटे हे मराठी भाषेतील लेखक आहेत. त्यांचा जन्म ११ एप्रिल, १९५० रोजी पंढरपूर येथे झाला. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण. हिंदी विषयात एम.ए.व पीएच. डी. प्राथमिक शिक्षण व बालपण पंढरपूरमध्ये. पुढे कोल्हापूरमध्ये उर्वरित शिक्षण व जगणे. उच्च शिक्षणासाठी गारगोटी येथील मौनी विद्यापीठात प्रवेश. तिथे परिस्थितीच्या जाणीवेने खडतर अध्ययन. भारत सरकारची शिष्यवृत्ती व महाराष्ट्र शासनाचा निर्वाह भत्ता या बळावर ग्रामीण विद्यापीठाच्या पदवी समकक्ष शिक्षक पदविकेत भारतात सर्वप्रथम. ’रोल ऑफ ऑनर’ ने भारत सरकारकडून सन्मानित. शालेय वयात साने गुरुजींचे साहित्य, वि.स. खांडेकरांचा सहवास, थोरामोठ्यांची व्याख्याने, आंतरभारती घडण यामुळे आयुष्यभर समर्पित शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य म्हणून कार्य करत निवृत्त. जीवनाच्या प्रत्येक वळणावर समरसून काम करण्याची वृत्ती. त्यामुळे प्रत्येक वेळी ’अशक्य ते शक्य करिता सायास’चा ध्यास. हायस्कूल शिक्षक असतानाच डॉक्टरेट मिळवून महाविद्यालयात. महविद्यालयात पुस्तके लिहून विद्यापीठात. प्राचार्य म्हणून उपक्रमांचा उच्चांक. अशा सतत ऊर्जस्वलतेमुळे जगण्याचा अनिवार ध्यास. सन २०१० मध्ये निवृत्त. त्यातूनच मग स्वावलंबनानंतर अनाथांच्या संगोपन व पुनर्वसन कार्यासाठी १९८० ते २००० असं दोन दशके अविरत सक्रिय प्रयत्न. कोल्हापूरच्या ’रिमांड होम’चे ’बालकल्याण संकुल’ मध्ये रूपांतर. महाराष्ट्र राज्य वंचित संस्थेचे अध्यक्षपद. ’समाज सेवा’ त्रैमासिकाचे संपादन. भारतीय शिष्टमंडळातून युरोप, आशिया खंडातील १५ देशांचे अभ्यास दौरे. त्यातून महाराष्ट्रभरच्या अनाथाश्रम, रिमांड होम्ससंबंधी प्रशासन यंत्रणा विकेंद्रीकरण, योजनांचे एकत्रीकरण, संस्था दर्जा सुधारणा, बालक धाेरण, बालकांचा राष्ट्रीय कायदा व ह्नकासंबंधी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराचे कार्य व सन्मान. सध्या सर्व पदांचा त्याग. मुक्त कार्यरत. हे सारे करीत मराठी, हिंदीत विपुल लेखन. आत्मकथा, लेखसंग्रह, कथासंग्रह, भाषण संग्रह, काव्य संग्रह, याशिवाय भाषांतर, संपादन, समीक्षात्मक लेखन. लेखनास महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका), भाषांतर व समीक्षेस भारत सरकारचे राष्ट्रीय पुरस्कार. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी जीवन गौरव, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्काराने गौरव. अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. महाराष्ट्रात अनेक वस्तुसंग्रहालयांंची निर्मिती. सामाजिक,प्रशासकीय,साहित्य क्षेत्रातिल हिमालया एवढी उंची असणारं निराधारांसाठी काम करणारं अवलिया व्यक्तीमत्व. महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रातील दिग्गज ज्यांच्या मार्गदर्शनासाठी आसुसलेले असतात.
असं थोर व्यक्तीमत्व.
सरांनी माझ्यासारख्या अगदी सामान्य शिक्षकाला गोड मधुर असं गिफ्ट पाठवलं.खरं तर नुसतं आठवणीत ठेवणं हेच कल्पनेबाहेरचं.गिफ्ट पाठवणं आणखी यापेक्षा मोठं भाग्य काय असावं बरं.
"खाली जमीन वर आकाश" सरांचं आत्मचरित्र" वाचुन बघा नक्कि जीवनाचा खरा अर्थ उमगल्याशिवाय राहाणार नाही.
✍श्यामसुंदर निरस✍