शासकीय निवासी शाळा पूर्णा वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३

H. M. Archana Hatkar
            दिनांक :- १३ जानेवारी २०२३ शासकीय निवासी शाळा पूर्णा ता. पूर्णा जि. परभणी येथे शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला.             
        कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  राऊत सर, शेवाळे सर, गोणारकर सर, गच्चे मॅडम, सोनवणे मॅडम, गायकवाड सर तसेच पालक आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती हटकर मॅडम यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक सादर केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक , गायन अशा विविध कला सादर केल्या. या कार्यक्रमासाठी  भालेराव सर, शिंदे सर, खेडकर सर, साखरे सर, गणगे सर, शिरसे मॅडम, कांबळे मॅडम, ठोके सर आदींनी मेहनत घेतली
            कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची वेशभूषा , नृत्य सराव भालेराव सर यांनी करून घेतला , भोजन व्यवस्था व बैठक व्यवस्था भराडे सर यांनी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेडकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिंदे सर यांनी केले.