शासकीय निवासी शाळा पूर्णा ता. पूर्णा जि. परभणी करिअर मार्गदर्शन

H. M. Archana Hatkar
दि . 29/09/2022 रोजी शासकीय निवासी शाळा पूर्णा जिल्हा परभणी येथे विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन याविषयी माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री रणजीत भराडे सर यांनी, विद्यार्थ्यांना विविध करिअरच्या संधी याबद्दल माहिती दिली, त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, भारतीय सेवा क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, कौशल्यावर आधारित क्षेत्र, स्पर्धा परीक्षा, अभ्यासक्रम व प्रवेश परीक्षा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले..यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री भालेराव सर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री खेडकर सर यांनी केले.त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हटकर मॅडम यांनी अध्यक्षीय समारोप केला. या वेळी श्री शिंदे सर, श्री साखरे सर , श्री गणगे सर,  श्री ठोके सर, श्रीमती कांबळे मॅडम, श्रीमती शिरसे मॅडम, सर्व विद्यार्थी इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती...