शासकीय निवासी शाळा पूर्णा जि. परभणी

H. M. Archana Hatkar


Good touch and Bad touch

दि. 28/09/2022 रोजी शासकीय निवासी शाळा पूर्णा जिल्हा परभणी येथे विद्यार्थ्यांना Good touch and  Bad touch याविषयी माहिती देण्यासाठी मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष, मुख्याध्यापिका श्रीमती हटकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. प्रमुख मार्गदर्शक श्री भालेराव एस. बी. सर यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात येणारे विविध अनुभव याबद्दल माहिती दिली, तसेच विद्यार्थ्यांना Good touch and Bad touch   याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले...
त्यानंतर शाळेचे अधीक्षक श्री रणजीत भराडे सर यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता व काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खेडकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री शिंदे सर यांनी केले या वेळी श्री साखरे सर , श्री गणगे सर,  श्री ठोके सर, सर्व विद्यार्थी इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती...