शासकीय निवासी शाळा पूर्णा ता. पूर्णा जि. परभणी
राष्ट्रीय क्रीडा दिन
आज दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी शासकीय निवासी शाळा पूर्णा जिल्हा परभणी येथे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली, मेजर ध्यानचंद यांचा जीवन परिचय विद्यार्थ्यांना देण्यात आला. त्यानंतर खेळाचे जीवनातील महत्त्व व खेळामध्ये असलेल्या करिअरच्या संधी याबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर शाळेमध्ये विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, त्याप्रसंगीची काही क्षण. प्रमुख उपस्थिती श्री शिंदे सर, श्री भालेराव सर, श्री खेडकर सर, श्री साखरे सर, श्री गणगे सर, श्रीमती शिरसे मॅडम , श्रीमती कांबळे मॅडम, शाळेतील सर्व विद्यार्थी.

