शासकीय निवासी शाळा पूर्णा जिल्हा परभणी
October 03, 2022
दिनांक :- 1 ऑक्टो 2022 शासकीय निवासी शाळा पूर्णा जिल्हा परभणी येथे पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे सहाय्यक ग्रंथपाल श्री गणगे के.पी. सर यांनी विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांची माहिती दिली . शाळेमध्ये उपलब्ध असलेली पुस्तके प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वाचनात प्रोत्साहन दिले व पुस्तकांबद्दल आवड निर्माण करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका श्री हटकर मॅडम, श्री भराडे सर, श्री शिंदे सर ,श्री भालेराव सर, श्री खेडकर सर, श्री साखरे सर, सर्व विद्यार्थी.