शासकीय निवासी शाळा पूर्णा - संविधान दिनाचा मुख्य कार्यक्रम. यावेळी श्री भालेराव सर सहशिक्षक यांनी प्रास्ताविक केले. अधिक्षक श्री रणजित भराडे सर यांनी भारतीय संविधना बद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले . त्यानंतर मुख्याध्यापक श्रीमती हटकर मॅडम यांनी समता पर्वा बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच संविधान दिनाबद्दल मार्गदर्शन केले.. प्रस्तविकेचे वाचन सामूहिक करून 26/11 मुंबई हुतात्म्यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून सर्वांनी आदरांजली वाहिली.. प्रभातफेरी नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिंदे सर यांनी केले , आभार प्रदर्शन श्री खेडकर सर यांनी केले तर फलक लेखन श्री गणगे सर, साखरे सर, ठोके सर व गोणारकर मॅडम यांनी केले..
November 26, 2022