समता पर्व
अनु जाती मुलांची शासकीय निवासी शाळा अकोली, ता.जिंतूर जि.परभणी
शासकीय निवासी शाळा अकोली ता.जिंतूर येथे संविधान दिन उत्साहात साजरा आज दिनांक:- २६/११/२०२२ रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने आज अनु जाती मुलांची शासकीय निवासी शाळा अकोली ता.जिंतूर येथे मा.सहाय्यक आयुक्त श्रीमती.गीता गुठ्ठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी व कर्मचारी यांची अकोली गावात संविधान रँली काढण्यात आली. तसेच शाळेत महामानवांच्या प्रतिमा व संविधान पूजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थिताना संविधान बद्दल मुख्याध्यापक श्री.रघुनाथ खेडेकर यांनी माहिती देवून मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी गृहपाल श्री.योगेश घुगे शाळेत प्रवेशित विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. श्री.बालाजी किरकन सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तसेच श्री.विष्णू दराडे सर यांनी संविधान वाचन केले, व श्री.सुनील निकाळजे सर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती.तारा भोसले मॅडम,श्री.राहुल गायकवाड,श्रीमती.माया घुगे,श्रीमती.शकुंतला लाखाडे सर्व B.V.G. कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास १२४ विद्यार्थी उपस्थित होते.