26 जानेवारी 2023 रोजी शासकीय निवासी शाळा पूर्णा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदरील कार्यक्रमांतर्गत शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक श्रीमती हटकर मॅडम यांच्या हस्ते पार पडले . हटकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले, श्री भराडे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिना बद्दल माहिती दिली व श्री भालेराव सर यांनी भारतीय संविधानात असलेल्या मूलभूत हक्क याबद्दल माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांनी गीत गायन व नृत्य सादर केले याप्रसंगी सूत्रसंचालन श्री खेडकर सर यांनी केले प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील कर्मचारी श्री शिंदे सर , श्री साखरे सर श्री गनगे सर ,श्री ठोके सर , श्रीमती शिरसे मॅडम तसेच क्रिस्टल व बीव्हीजी कर्मचारी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या शेवटी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा यामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व बालविवाहाची प्रतिबंध शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला त्याप्रसंगीचे काही क्षणचित्रे