समाज कल्याण , परभणी येथील मा.सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे मॅडम यांनी शाळेस भेट दिली असता या पुस्तक प्रदर्शन उपक्रमाची पाहणी केली व नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल श्री गणगे सर यांचे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या....
"वाचन संस्कृती विकासासाठी पुस्तक प्रदर्शन "
January 23, 2023
"वाचन संस्कृती विकासासाठी पुस्तक प्रदर्शन " हा नाविन्यपूर्ण उपक्रम शासकीय निवासी शाळा , पूर्णा येथे सहायक ग्रंथपाल श्री गणगे सर यांच्या संकल्पनेतून राबवला जात आहे. हे पुस्तक प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी नेहमी खुले असून विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार या प्रदर्शन कक्षात येऊन त्यांच्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करतात.