जागतिक सूर्यनमस्कार दिन शा.नि. शा. पूर्णा

H. M. Archana Hatkar
जागतिक सूर्यनमस्कार दिन
दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पूर्णा येथे विद्यार्थ्यांसाठी सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते... शाळेतील सहशिक्षक श्री भालेराव एस.बी यांनी विद्यार्थ्यांना सूर्य नमस्कारा विषयी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात  सूर्यनमस्काराचा सराव करत सूर्यनमस्कार सादर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हटकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे आरोग्यदायी लाभ याविषयी माहिती दिली. भराडे सर, शिंदे सर, खेडकर सर, साखरे सर, गणगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराचा सराव केला.