शासकीय निवासी शाळा पूर्णा - काल रात्रीचा अभ्यास सुरू असताना आकाशात दिसलेल्या अद्भुत खगोलीय वस्तुने विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा जागृत झाली आणि ते गृह आणि तारे याविषयी अनेक प्रश्न विचारत होते..त्या सर्वांचे समाधानकारक उत्तरे मी देण्याचा प्रयत्न केला.. मुळात सायन्स background असल्याने या सर्व गोष्टी माहीत च होत्या.. चर्चा झाल्यानंतर आम्ही सर्वजण प्रोजेक्टर रूम मध्ये गेलो आणि गृह तारे live दाखवले.. नासा च्या website वर जाऊन james web telescope ने काढलेल्या फोटो दाखविल्या.. sattellite लॉन्चिंग कशी असते ते देखील दाखवले .. आपण मनुष्य आणि त्याचे अस्तित्व या पोकळीत अतिशय छोटे आहे हे देखील दाखवले .. आपली आकाशगंगा the milky way कशी दिसते ते दाखविले .. आणि एका आकाशगंगेत लाखो तारे असतात..त्यांच्या भोवती असंख्य गृह उपग्रह फिरत असतात..आणि अशा अरबो galaxy आहेत.. आपण आज जर मोजण्यास सुरुवात केली तर मरेपर्यंत पण आपण मोजून पुर्ण होणार नाहीत एवढ्या galaxy ahet .. विद्यार्थी खुश झाले...आपला - रणजित भराडे

ranjit bharade