दिनांक १९.०२.२०२३ रोजी सकाळी 10.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय परभणी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमांचे वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर आधारीत व्याख्यान श्रीमती गिता गुठ्ठे सहायक आयुक्त, समाजकल्याण परभणी यांनी केले. कार्यक्रमास कार्यालयातील सर्व शासकीय अधिकारी/ कर्मचारी, बाह्यस्त्रोत कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन श्रीमती एम.एम.पेदेवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यालय अधिक्षक श्री. बी.एन.स्वामी यांनी केले. कार्यक्रमाची सुरवात “राज्यगिताने” व कार्यक्रमांचा समारोप “राष्ट्रगीताने” करण्यात आला. त्यांनंतर कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
तसेच सहायक आयुक्त, समाजकल्याण परभणी कार्यालयाच्या अधिनस्त 4 शासकीय निवासी शाळा व 9 शासकीय वसतिगृहात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” च्या औचित्यवर महाराष्ट्राचे “राज्यगीत” स्वीकृत व छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमास शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक, इतर कर्मचारीवृंद व प्रवेशित विद्यार्थी/विद्यार्थीनी उपस्थित होते.